Boycott Sitaare Zameen Par : आमिर खानची 'सितारे जमिन पर' होतोय सोशल मीडियावर #Boycott Trend; जाणून घ्या कारण
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा 'सितारे जमिन पर' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 2007 साली आलेल्या त्याच्या 'तारे जमिन पर'चा सिक्वल आहे. या चित्रपटात आमिर खाननं मुख्य भूमिका साकारली असून अभिनेत्री जिनिलिया डिसूजादेखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात डाउन सिंड्रोम आणि न्युरो डाइवर्जेंस असलेल्या मुलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मात्र 20 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवसापासून ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. सोशल मीडियावर #BoycottSitaareZameenPar ट्रेंड होत आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी 'सितारे जमिन पर' थिएटरमध्ये पाहिला आणि सोशल मीडियावर निगेटिव्ह पोस्ट केली. काहींना हा चित्रपट अजिबात आवडला नाही, काहींनी चित्रपटाची कथा भरकटत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेता आमिर खानसाठी हा मोठा झटका आहे. यापूर्वी 2022 साली 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटालाही प्रेक्षकांनी Boycott ची पाटी दाखवली होती. तर 2018 साली प्रदर्शित झालेला 'ठ्ग्ज ऑफ हिंदुस्तान' हा आमिरचा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यामुळे आमिर खानचा सलग तिसरा चित्रपट फ्लॉप ठरण्याच्या मार्गावर असून त्याच्या फिल्मी ग्राफसाठी ही धोकादायक स्थिती आहे. आमिरचे चित्रपट न केवळ फ्लॉप ठरत आहेत, तर ते कोणीच पाहू नयेत यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात Boycott ट्रेंडही होत आहेत. ''सितारे जमिन पर' हा चित्ररट आर. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून हा स्पेनिश फिल्म 'चॅम्पियन्स'चा रीमेक आहे.