शिवसेनेचे साम्राज्य उध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहे - अब्दुल सत्तार
Admin

शिवसेनेचे साम्राज्य उध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहे - अब्दुल सत्तार

शिवसेनेचा साम्राज्य उध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहे,

कल्पना नळसकर - असूर, नागपूर

शिवसेनेचा साम्राज्य उध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहे, राजकारणाचे समीकरण कुठे जोडायचे कसे जोडायचे, काय बोलायचं कुठे बोलायचं, त्याचे परिणाम काय याची जाणीव न ठेवत ते बोलत असता. संसदीय पदाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी सन्मान ठेवायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करणे हे चुकीच आहे. काहीही बोलून चालत नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. असे सत्तार म्हणाले.

विजय पराजय होत राहतो. कसब्याच्या पराभवाचे चिंतन मनन आवश्यक आहे, पराभवाचे मूळ कारण काय हे शोधल्या जाईल, भविष्यात ते पुन्हा होऊ नये याची दक्षता घेतल्या जाईल. असे देखिल सत्तार यांनी सांगितले.

सर्व सामान्य माणसापर्यंत तो संदेश जावा लोकांपर्यंत जाऊ, नव्याने पक्षप्रमुख झाल्याने त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जनसंपर्क होईल सर्वसामान्य माणसाची संवाद साधता येईल त्यासाठी धनयुष्यबाण यात्रा चालू होणार आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून यात्रा जाणार असून, येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेच मोठं योगदान ठरेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com