Abdul Sattar
Abdul SattarTeam Lokshahi

अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, 'या'प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याची सीबीआयकडे तक्रार

सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्त्यानी कृषी मंत्री अब्दुल सत्तार याच्या विरोधात सी बी आय कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही दिवसापासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मागे मोठ्या प्रमाणात शुलकास्ट लागले असून दिवसेंदिवस त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. तर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या आणखी एक अडचण समोर उभी ठाकली आहे. अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यासह एकूण पाच जणांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण त्यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांच्याविरोधात जी तक्रार दाखल करण्यात आली यामध्ये तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे.

Abdul Sattar
अजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाल,धर्मवीर ही पदवी तुम्ही...

अब्दुल सत्तारांच्या विरोधात आजपर्यंत झालेल्या तक्रारींचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. सत्तार यांनी जमीन कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com