माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार; अभिजीत बिचुकले

माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार; अभिजीत बिचुकले

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले वादग्रस्त विषयामुळे नेहमी चर्चेत असतो. यातच आता अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले वादग्रस्त विषयामुळे नेहमी चर्चेत असतो. यातच आता अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अभिजीत बिचुकलेनं लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्यानं पत्नी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहिताना त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

त्याने पत्रात लिहिले की, 'महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री' असा उल्लेख करत पत्राची सुरुवात केली आहे व पुढे लिहिले की, 'मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्या महिलेला भारतीय संस्कृतीची पूर्ण माहिती असायला हवी. संपूर्ण भारताला ती संस्कृती जपणाऱ्या आणि चालवणाऱ्या गृहिणीची गरज आहे आणि माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचे सौंदर्य, संस्कृती आणि प्रतिष्ठा जपणारी आहे. मी स्वत: संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे. असे त्याने पत्रात लिहिले आहे.

यासोबतच पुढे लिहिले की, 'मी हे पहिल्यांदाच बोललो नाही. आमच्या सौभाग्यवतींनी 2009 मध्ये उदयनराजेंविरुद्ध पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा साताऱ्यात पत्रकार परिषदेत मी हे बोललो होतो. स्वातंत्र्यापासून या क्षेत्रावर नेहमीच पुरुषांची मक्तेदारी राहिली आहे. असे लिहिले आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com