“आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले; अभिजित बिचुकलेंचा CM एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला

“आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले; अभिजित बिचुकलेंचा CM एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला

मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. यावरुन एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. यावरुन एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. या वादात आता अभिनेता अभिजित बिचुकलेंनी उडी घेतली आहे. एका प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, दसरा मेळाव्यासंदर्भातील तुमचं मत काय आहे? यावर उत्तर देताना ते म्हणाले, “दसरा मेळाव्याबद्दल मी एकच सांगेन, सदविवेक बुद्धी असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी घराबाहेर पडू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या हा सण तुम्ही तुमच्या घरी कुटुंबियांबरोबर, समाजाबरोबर आणि मित्र तसेच सहकाऱ्यांसोबत साजरा करा,” असे म्हटले.

तसेच मी आता सणासुदीचे दिवस सोडून मेळावे घेणार असून महाराष्ट्रातील समाजाच्या भल्यासाठी काम करणार “मी कधीही दसरा मेळावा करणार नाही. मी दसरा, दिवाळी, गुडीपाडवा हे सोडून माझे मेळावे घेईन. आता माझी वेळ आली महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची. प्रत्येकाचा काळ असतो. सर्वांचा काळ गेला. आता अभिजित बिचुकले येईल. एखाद्या धर्माच्या, जातीच्या किंवा प्रांताच्या नाही तर या सर्व समाजासाठी काम करेन,” असे बिचुकले म्हणाले.

यासोबतच “हे जे लोक कोल्हेकुई करतात, नालायकपणा करतात त्यांचे विचार सांगून स्वत:ची खळगी भरतात. त्यांच्या नातवंडांपर्यंत ते सुखी राहतात,” “आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले आहेत,” असं म्हणत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

“आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले; अभिजित बिचुकलेंचा CM एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला
“इतरांच्या अंतर्वस्त्रास हात घालाल तर…”; शिवसेनेचा भाजपाला इशारा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com