Two-Wheeler Safety Rules Updated in 2025 : दुचाकी अपघात रोखण्यासाठी सरकारचा पुढाकार: ABS आणि दोन हेल्मेट अनिवार्य

Two-Wheeler Safety Rules Updated in 2025 : दुचाकी अपघात रोखण्यासाठी सरकारचा पुढाकार: ABS आणि दोन हेल्मेट अनिवार्य

दुचाकी अपघात रोखण्यासाठी ABS प्रणाली अनिवार्य: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Published by :
Team Lokshahi
Published on

Two-Wheeler Safety Rules Updated in 2025 : दररोज दुचाकी अपघात रोखण्यासाठी सरकारचा पुढाकार: ABS आणि दोन हेल्मेट अनिवार्यहोणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून भारतातील सर्व दुचाकींमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अनिवार्य असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हा निर्णय दुचाकी अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट आणण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा सरकारचा विश्वास आहे. आतापर्यंत केवळ 125 सीसी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींमध्ये ABS लागू होत होता. मात्र आता 100 सीसीपासून ते 500 सीसीपर्यंतच्या सर्व दुचाकींमध्ये ही प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.

ABS म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ही एक आधुनिक ब्रेकिंग प्रणाली आहे जी ब्रेक दाबल्यावर चाकं लॉक होण्यापासून रोखते. या प्रणालीमुळे रायडरला आपले वाहन नियंत्रित ठेवता येते आणि वाहन घसरून अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. ही प्रणाली चाकांच्या फिरण्याचा वेग सतत तपासत असते. अचानक ब्रेक लावल्यास ती ब्रेकचा दाब स्वयंचलितरीत्या नियंत्रित करते. यामुळे दुचाकीचा तोल राखणे सोपे जाते. सिंगल चॅनेल ABS फक्त पुढच्या चाकावर काम करते, तर ड्युअल चॅनेल ABS पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर नियंत्रण ठेवते – ज्यामुळे सुरक्षितता अधिक वाढते.

दुचाकीसोबत दोन हेल्मेट अनिवार्य

सुरक्षेला आणखी प्राधान्य देत, सरकारने एक नवीन नियम आणण्याची तयारी केली आहे. 2026 पासून प्रत्येक नवीन दुचाकी खरेदी करताना डीलरकडून ग्राहकाला BIS प्रमाणित दोन हेल्मेट देणे बंधनकारक असणार आहे. यामुळे डोक्याच्या गंभीर दुखापतीपासून बचाव करता येईल, असा उद्देश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com