Abu Azmi on MNS : मनसेवर निर्बंध लावलेच पाहिजेत... - अबू आझमी
मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वाद उसळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरुन आता मोठ्या प्रमाणात वाददेखील निर्माण झाले आहेत.
याबद्दल सुनील शुक्ला म्हणाले की, "राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदू्ंना मारायचा आदेश दिला आहे, असं वाटतं. तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात. म्हणून मी तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. हिंदुंना तुम्ही मारू शकत नाही. आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्द आदेश आणणारच". या सगळ्याला आता समाजवादी पक्षाचे नेते अबू अझमी यांनी भाष्य केले आहे.
अबू आझमी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला समर्थन दर्शवले आहे. तसेच मनसे हा पक्ष लोकांमध्ये फूट पडणारा पक्ष असल्याचेदेखील ते म्हणाले आहेत.