सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात;10 भाविकांचा मृत्यू तर 12 भाविक जखमी
Admin

सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात;10 भाविकांचा मृत्यू तर 12 भाविक जखमी

सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 12 भाविक जखमी झाले आहेत. खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. पाथरेजवळ झालेल्या ट्रक आणि खाजगी बसमधील अपघातातील जखमींना शिर्डी आणि नगरच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने पाठविण्यात आले आहे.

आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. अपघात घडल्यानंतर झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, अपघात इतका भीषण होता की नागरिकांच्या ओरडण्याने परिसरातील गावकरी मदतीसाठी एकवटले होते. ग्रामस्थांनी जे जखमी झाले आहे त्यांना बाहेर काढून येणाऱ्या जणाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रवाना केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com