रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात

रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात

रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

निसार शेख, रत्नागिरी

रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला आहे. राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीच्या च्या मातीचे सर्वेक्षण आज करण्यात येत असून काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

या यासाठी विविध भागातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आले आहेत राजापूर येथे बंदोबस्तासाठी पोलिसांच्या वाहनाला आडीवरे नजीक अपघात झाल्याचे कळत आहे. बंदोबस्ताचे जाणारे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला आहे. या अपघातात 17 पोलिस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com