मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, तर दोनजण जखमी
Admin

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, तर दोनजण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com