बातम्या
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीनजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्से गावाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरच्या ट्रकला या कारनं मागच्या दिशेनं जोरात धडक दिली.
ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचे समजते. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाला. अशी माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. आता मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.