महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर, आरोप प्रत्यारोप, वादाची ठिणगी

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर, आरोप प्रत्यारोप, वादाची ठिणगी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. मात्र त्यातच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळत आहे.
Published by :
shweta walge
Published on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. मात्र त्यातच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. यातच यानंतर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी ए...मिटकरी, तुझी पात्रता आहे का? असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची लायकीच काढली आहे. या सर्व टीकेमुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे सडकून टीका करत म्हणाले की,

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी सडकून टीका केली. आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील नेतृत्व हेच विश्वासघात करणार आहे. त्याची तमा आम्ही बाळगणार नाही. आम्ही तर जाहीरपणे सांगितले आहे की तुम्हाला लढायचे असेल तर आमच्या विरोधात जाहीरपणे लढा. पण महायुतीच्या विरोधात होणारी गद्दारी आम्ही खपवून घेणार नाही.

रामदास कदम यांचा रविंद्र चव्हाणांवर टीकास्त्र

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे खेड-दापोली-मंडणगड येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत, मुंबई गोवा मार्गाच्या कामाविषयी संताप व्यक्त केला. १४ वर्षांनंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला होता. परंतु मुंबई गोवा मार्गाचा आमचा वनवास संपत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी डिसेंबरमध्ये जाहीर केले होते की, पुढील गणपतीमध्ये मुंबई गोवा रस्ता पूर्ण होईल. परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबई गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरे कशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. हे अत्यंत कुचकामी मंत्री आहेत. युती असतानाही मी हे जाहीरपणे बोलत आहे. कारण कोकणातील लोक आम्हाला जाब विचारत आहेत, अशी टीका कदम यांनी केली.

जगदीश मुळीक यांची अमोल मिटकरींवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जुन्नरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपच्या कृत्याचा थेट जाब देवेंद्र फडणवीसांना विचारला. अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे.काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा.आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मिटकरींनी केली होती. यावरून भाजप नेते जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांना डिवचले आहे. ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार!, असे ट्विट करत मुळीक यांनी मिटकरी यांची थेट लायकीच काढली आहे.

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर, आरोप प्रत्यारोप, वादाची ठिणगी
Balasaheb Thorat : कोणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष संपतो असं नाही
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com