Mumbai Powai Studio Case : पवईत ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बंधक बनवणारा आरोपी जखमी
Mumbai Powai Studio Case : पवईत ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बंधक बनवणारा आरोपी जखमी Mumbai Powai Studio Case : पवईत ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बंधक बनवणारा आरोपी जखमी

Mumbai Powai Studio Case : पवईत ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बंधक बनवणारा आरोपीचा मृत्यू

पोलिसांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांकडून आरोपी रोहित आर्याला छातीत डाव्या बाजूला गोळी लागल्याने आरोपी जखमी झाला आहे. दवाखान्यात घेऊन गेला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबईच्या पवई परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने पवईतील RA स्टुडिओमध्ये २५ ते ३० मुलांना ऑडिशनच्या नावाखाली ओलिस ठेवलं. त्याने मुलांना बंदुकीचा धाक दाखवून बंधक बनवले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली, ज्यामुळे पालकांची चिंता वाढली होती.

पोलिसांची तातडीने कारवाई:

पवई पोलिसांना दुपारी पावणे दोनच्या सुमारास कॉल आला, ज्यामध्ये मुलांना बंधक बनवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बंधक ठेवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. पोलिसांनी बाथरूमच्या मार्गाने प्रवेश करून सर्व मुलांची सुटका केली. सुटकेत १७ मुलं, एक वृद्ध व्यक्ती आणि एक इतर व्यक्ती सामील होते. या मुलांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांकडून आरोपी रोहित आर्याला छातीत डाव्या बाजूला गोळी लागल्याने आरोपी जखमी झाला आहे. दवाखान्यात घेऊन गेला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

स्टुडिओमध्ये आढळले एअर गन आणि केमिकल्स:

पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, रोहित आर्यकडे एक एअर गन आणि स्टुडिओमध्ये काही केमिकल्स सापडले. त्यानंतर पोलिसांनी स्टुडिओत सर्च ऑपरेशन सुरू केलं.

रोहित आर्य कोण आहे?

रोहित आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषण करत होता. त्याचे सरकारकडे पैसे अडकले होते. त्याने लोन घेऊन शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता, पण त्याला त्याचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे त्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com