ताज्या बातम्या
हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई होणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय होण्याची शक्यता
हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळत असून परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळत असून परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज होणाऱ्या बैठकीत हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याच्याआधी हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची नियमावली तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र याबाबत पुढे काहीच हालचाल न झाल्याने आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अनेक लोकं वाहन चालविताना हेडफोन घालून चित्रपट, व्हिडिओ पाहतात त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आजच्या बैठकीत यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.