Anjali Damania यांच्या ट्विटनंतर अखेर बीडमध्ये अनधिकृत शस्त्र परवान्यांवर कारवाई
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्रामध्ये वातवरण तापलं आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीचा मुद्दा प्रकाशात आला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत बीडमधील शस्त्र परवान्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आला होता. दरम्यान याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये प्राथमिक स्वरूपात 100 परवाने रद्द केले असून यात वाल्मीक कराड याच्या शस्त्राचा देखील समावेश आहे.
बीड जिल्ह्यात शस्त्र परवान्यावरून राजकारण तापले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा प्रश्न समोर आणला होता. दरम्यान याची प्रशासनाने दखल घेतली असून ज्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तसेच ज्याला न्यायालयाकडून एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झाली. त्याचा शस्त्र परवाना रद्द केला जात आहे. दरम्यान आत्तापर्यंत प्रशासनाने 100 परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या शस्त्र परवान्याचा देखील समावेश आहे.