भारतीय तटरक्षक दलाची कारवाई; स्फोटके आणि तब्बल ३०० कोटींची ४० किलो अंमलीपदार्थ पाकिस्तानी बोट पकडली
Admin

भारतीय तटरक्षक दलाची कारवाई; स्फोटके आणि तब्बल ३०० कोटींची ४० किलो अंमलीपदार्थ पाकिस्तानी बोट पकडली

भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पहाटे पाकिस्तनची मासे पकडणारी अल सोहेली नावाची एक बोट भारतीय समुद्री हद्दीत संशियीतरित्या फिरताना आढळून आली. आयसीजीने त्यांना हटकल्यानंतरही दिल्यानंतरही बोटीवरील चालकांकडून जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर आयसीजीने त्यांना इशारा देण्यासाठी गोळीबारही केला, परंतु तरीही ती बोट थांबली नाही. यानंतर आयसीजीच्या जवानांनी ती बोट पकडली.

शस्त्रसाठा, स्फोटके आणि तब्बल ३०० कोटींची ४० किलो अंमलीपदार्थ घेऊन जाणारी दहा जणांसह असेलेली एक पाकिस्तानी बोट आज गुजरात किनाऱ्यावर पकडली आहे.गुप्त माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने २५ आणि २६ डिसेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषा क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी ‘ICGS Arinjay’ हे जलद गस्त जहाज तैनात केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com