मित्रांसोबत गाडीच्या टपावर बसून भाईगिरी करणं तरुणाला भोवलं; पोलिसांनी चांगलीच मस्ती जिरवली
जळगाव शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवून प्रसारित करणाऱ्या इसमावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
जळगावमधील एका इसमाने शहरात त्याच्या मित्राच्या गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ केला. त्यानंतर त्याने तो व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. विठ्ठल पाटील असे या इसमाचे नाव आहे.
जळगावातील आकाशवाणी चौकात 16 मे रोजी रात्री साडेदहा वाजता हा सर्व प्रकार घडला. आपण जळगाव शहराचे मन्या सुर्वे डॉन असल्याचा उल्लेख करत व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. कारवाई केल्यानंतर त्याने हात जोडून माफी मागितली.
त्यानंतर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारचे कृत्य किंवा व्हिडिओ बनवणाऱ्यांनावर देखील कारवाई करण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.