बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात

बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात

मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. हे पोस्टर्स लावण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु परवानगी न घेता अनाधिकृत होर्डिंग लावले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले.

बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून होर्डींगच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर तसेच वेब साईटवरही तक्रार दाखल करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली. तसेच या कारवाईसाठी 26 वाहनं कर्मचाऱ्यांसह तैनात केल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या वर्षभराच्या कालावधीत पालिकेने धडक मोहिम आखून तब्बल 16 हजार 360 होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई केली आहे. तर 164 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम आणि इतर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी चौकांमधील, रस्त्यावर होर्डिंगला प्राधान्य देतात. हे पोस्टर्स लावण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु परवानगी न घेता अनाधिकृत होर्डिंग लावले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com