पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची कारवाई;  मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँक सुरु ठेवणे भोवलं

पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची कारवाई; मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँक सुरु ठेवणे भोवलं

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता. या व्हिडिओमध्ये बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे म्हटले होते.

हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी म्हटले होते की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा? असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँकेची शाखा सुरू ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com