पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची कारवाई; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची कारवाई; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
Published on

पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँकेची शाखा सुरू ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, PDCC बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे... मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे... तसंच त्या रात्रीचं #CCTV फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे.

तसेच ते पुढे म्हणाले की, बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com