जळगावमध्ये ड्रग्सप्रकरणी कारवाई; ड्रग्स विक्री करणारे 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगावमध्ये ड्रग्सप्रकरणी कारवाई; ड्रग्स विक्री करणारे 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगावमध्ये ड्रग्सप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जळगावमध्ये ड्रग्सप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या इमरान उर्फ इम्मा हसन भिस्ती व गोकुळ विश्वनाथ उमप या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयितांकडून सुमारे 10 लाखाचे एमडी ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी भुसावळ शहरात 72 लाखाचे एमडी ड्रग्स आढळल्यानंतर जळगाव मध्येही मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स आढळल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com