ताज्या बातम्या
अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले की, महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवला त्याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे.
मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून महाराजांनी सही-शिक्क्याचे पत्र घेतले होते. तसेच, स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते, याचेही पुरावे उपलब्ध आहेत. असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले आहे.
वादग्रस्त विधान केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत.