ताज्या बातम्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य भोवलं, राहुल सोलापुरकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
राहुल सोलापूरकरांच्या अडचणी वाढल्या
अभिनेते राहुल सोलापुरकर हे आता त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. आंबेकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. जो अभ्यास करतो तो ब्राह्मण या वेदांमधील वचनाप्रमाणे ब्राह्मण ठरतात" असे सोलापुरकर म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले
यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. परिणामी राहुल सोलापुरकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.