'RRR' फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन
Admin

'RRR' फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन

'RRR' फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar

'RRR' फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन झाले. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.'आरआरआर' या सिनेमात रे स्टीवेन्सन खलनायकाच्या भूमिकेत होते.या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

'आरआरआर' या सिनेमानंतर रे स्टीवेन्सन यांनी 'अॅक्सीडेंट मॅन : हिटमॅन हॉलिडे' या सिनेमात काम केलं आहे. 'द थ्योरी ऑफ फ्लाइट' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.

'आरआरआर' या सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी 'आरआरआर' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा रे स्टीवेन्सन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. "धक्कादायक... रे स्टीवेन्सन यांचं निधन झालं आहे यावर विश्वास बसत नाही. असे म्हणत त्यांनी फोटो शेअर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com