Alia Bhatt: नऊवारी साडी अन् हातात गजरा; आलिया भट्टची मनमोहक अदा, फोटो पाहिलेत का?

Alia Bhatt: नऊवारी साडी अन् हातात गजरा; आलिया भट्टची मनमोहक अदा, फोटो पाहिलेत का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने चर्चेत आली आहे.
Published on

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने चर्चेत आली आहे. परंतु यावेळी ती ग्लॅमरस वेस्टर्न लूकमुळे नाही, तर तिच्या पारंपरिक मराठमोळ्या साडीतल्या लूकमुळे चर्चेत आहे. 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘वेव्ह समिट 2025’ या कार्यक्रमात आलियाने पारंपरिक पैठणी साडी नेसली होती.

तिचा हा मनमोहक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पीच, गुलाबी आणि नारंगी अशा आकर्षक छटांनी नटलेली ही साडी पारंपरिक नऊवारी पद्धतीने नेसली आहे. या साडीवर आलियाने आलियाने पेस्टल गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. आलियाचा हा पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलियाचा हा मराठमोळा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिला "महाराष्ट्रीयन साजणी", "एलिगंट आणि पारंपरिक" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com