Anushka Sharma on Virat Kohli : विराटच्या निवृत्तीवर अनुष्काची भावनिक पोस्ट ; 'मी नेहमीच कल्पना केली होती की...'
रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. विराट कोहलीने तात्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली . याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने या मोठ्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो शेअर केला.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिले की, "ते विक्रम आणि टप्पे याबद्दल बोलतील ,पण तू कधीही न दाखवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेली लढाई आणि खेळाच्या या स्वरूपाला तू दिलेले अढळ प्रेम मला आठवेल. मला माहित आहे की या सर्व गोष्टींनी तुझ्याकडून किती काही घेतले आहे. प्रत्येक कसोटीच्या मालिकेनंतर, तू थोडा शहाणा, थोडा नम्र झालास. तुला या सर्वांमधून विकसित होताना पाहणे हा एक भाग्य आहे."
"कसा तरी, मी नेहमीच कल्पना केली होती की तू पांढऱ्या रंगात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होशील. पण तू नेहमीच तुझ्या मनाचे ऐकले आहेस, आणि म्हणून मी फक्त माझे प्रेम सांगू इच्छिते, तू या निरोपाचा प्रत्येक भाग मिळवला आहेस," ती पुढे म्हणाली.