Aditya Thackeray: "स्वतःच्या स्वार्थासाठी जे जातात ते जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात म्हणतात"
मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दिप या निवासस्थानी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यात दोन तास चर्चा झाली. आज माजी आमदार राजन साळवी हे पक्षात प्रवेश करत आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता पक्षप्रवेश करण्यात येईल.
याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत ऑपरेशन टायगरर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते भाजपला टोला देत म्हणाले की, "भाजपचं म्हणतो भाजपचे दाग अच्छे है". त्याचसोबत आदित्य ठाकरे यांनी भाजपसह शिवसेना शिंदेंच्या गटावर ही घणाघाती टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "सध्या सत्तेत बसलेल्या बहूमताने आलेला भाजप पक्ष, मिंधे पक्ष आणि एक राष्ट्रवादी पक्ष या तीन पक्षानी फोडाफोडी शिवाय दुसर काही नाही केल. ठीक आहे, तुम्ही आमचा पक्ष जितका फोडायचा फोडा, ज्यांना घ्यायचं आहे घ्या, जे भ्रष्ट आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना घ्या. हे जे पळून जाणारे आहेत ते जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात म्हणतात. जो व्यक्ती पैशासाठी किंवा सत्तेसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी घाबरुन पळून जातो तो कधी जय महाराष्ट्र नाही म्हणू नाही शकणार तो जय गुजरात म्हणार, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे".