Aaditya Thackeray : 'मुंबईची भाषा मराठीच, भैय्याजी जोशी यांना सांगितलं पाहिजे', आदित्य ठाकरेंची टीका
राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. ज्यावर आता विधानसभेत पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला आहे, त्याचसोबत भैय्याजी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याचपार्श्वभूमिवर आता आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "मराठी भाषेचा अपमान सातत्याने केला जात आहे. काल भैय्याजी जोशी यांनी जे काही वक्तव्य केलेले आहे ते सगळ्यांनी ऐकून घ्यावा, कारण भाजपची पण भूमिका पाहिली तर महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान ते सातत्याने करत आहेत. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर त्यांनी महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, असं देखील सांगितलं आणि त्याचा प्रचार केला. परंतु मराठी भाषा भवनला त्या लोकांनी स्थगिती दिलेली आहे. मराठी नाट्य दालन आपण तयार करत होतो ते देखील रद्द केलेलं आहे. कोश्यारी कोरटकर किंवा सोलापूरकर हे वारंवार अपमान करत आहेत ", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, "भैय्याजी जोशी यांनी कालच वक्तव्य होतं की, "घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. मग आज आपण पाहिला पाहिजे की, बुलेट ट्रेन करत आहे ते नक्की कोणासाठी आहे? माझ्यामध्ये दक्षिणेकडील राज्य आहे ते अभिमानांने सांगतात की, आमच्याकडे जे लोक येतात त्यांच्यासाठी आमची भाषा आहे. त्यासाठी भैय्याजी जोशी यांनी माफी मागितली पाहिजे. यावरती आपण जर आधी पाहिलं तर अबू आझमी यांच्यावरती आपण कारवाई केली. तर यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे. काल अबू आजमी वर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आता यांच्यावरती पण मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं पाहिजे", असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे.
नेमक प्रकरण काय? काय म्हणाले होते भैय्याजी जोशी
घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, "मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. जसे की, मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तसेच गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी आहेत, तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळून येतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता यायला हवं", असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.