उद्योगमंत्री कोण आहेत? गद्दार; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

उद्योगमंत्री कोण आहेत? गद्दार; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे.

आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे. सध्या सुरु असलेला वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आलेला विषय यावरुन राजकारण चांगलेत तापले आहे.

यावरुन आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी सुरु होती. उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर सभेसाठी जमलेल्या शिवसैनिकांनी गद्दार, असं उत्तर दिलं. तीन वेळा आदित्य यांनी हा प्रश्न विचारला आणि शिवसैनिकांनी त्यांना गद्दार म्हणत उत्तर दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करतानाच त्यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याची टीका केली आहे. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोंडसुख घेतलं आहे.

 उद्योगमंत्री कोण आहेत? गद्दार; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; झेड सुरक्षा असूनही खासगी गाड्या ताफ्यात
Lokshahi
www.lokshahi.com