Aaditya Thackeray : 'भाजपच्या मनात मुंबईबद्दल एवढा द्वेष का?;', मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

पावसामुळे मुंबईकरांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींसाठी सरकार आणि पालिका प्रशासनावर आमदार आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.
Published by :
Rashmi Mane

शिवसेना उबाठा गटाचे नेते, वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींसाठी सरकार आणि पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. मुंबई मेट्रो ३ च्या वरळी स्थानकाची दुरवस्था झाली होती. रस्ते, नालेसफाई, पाणी साचणे या सर्व विषयांवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर घेतले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com