Admin
बातम्या
आदित्य ठाकरेंना सलग दुसरा दे धक्का; वांद्रे नंतर आता पवई तलावातील प्रकल्प रद्द
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरेंना सलग दुसरा धक्का दिला आहे. वांद्रे नंतर आता पवई तलावातील प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील ड्रीम प्रोजेक्टला एका पाठोपाठ एक सुरुंग लावण्याचे काम आता भाजपने सुरू केले आहे. गेल्याच आठवड्यात माहीम वांद्रे वॉल्क वे सायकल ट्रॅक रद्द करण्यात आला.
त्यानंतर आता प्रशासनाने पवई तलाव येथील सायकल ट्रॅक प्रकल्प ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना हा दुसरा धक्का मानला जात आहे.