Aditya Thackeray To Join RahuL Gandhi Bharat Jodo Yatra
Aditya Thackeray To Join RahuL Gandhi Bharat Jodo YatraTeam Lokshahi

भारत जोडो यात्रे'त आदित्य ठाकरे सहभागी होणार, यात्रेत राहुल गांधींसोबत पायी चालणार

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे.ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार असून या यात्रेत शिवसेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.

गजानन वाणी : हिंगोली | काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे.ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार असून या यात्रेत शिवसेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.

Aditya Thackeray To Join RahuL Gandhi Bharat Jodo Yatra
भूकंपाचा काळात उपयुक्त असणारे हे पाच अॅप तुम्हाला माहित आहेत का ?

आज दुपारी चार वाजता ठाकरे या यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज 65 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा पाचवा दिवस आहे. काल यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे या देखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

देशभरात मोदी सरकारविरोधात काढण्यात आलेल्या या यात्रेत देशभरातील विविध पक्ष संघटनांनी सहभाग नोंदवून सत्ताधारी सरकारविरोधात एल्गार पुकारल्याचं यात्रेतून दिसून आहे.दरम्यान, भारत जोडो यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार आहे.आदित्य ठाकरे हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यात्रेत उपस्थिती लावणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com