'शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' भर सभेत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

'शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' भर सभेत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

वाघेरे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Published by :
shweta walge

महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अदित्य ठाकरेंनी संजोग वाघेरेच्या कानात तुम्ही फक्त अर्ज भरा. अर्ज भरताना त्यात चूक होऊ देऊ नका. तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी जनतेनं घेतली आहे. मावळ मतदारसंघाने घेतली आहे, असं सांगितलं आणि विजयी होणार असल्याचा विश्वास दिला. वाघेरे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावरच प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. सोबत येताय की आत टाकू असंही त्यांना धमकावण्यात आलं. तेव्हा ते रडत होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केलाय.

गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस, दुष्काळ झालं. त्यावेळी एकतरी गद्दार मंत्री शेताच्या बांधावर आला का? मदत मिळाली का? मी खोटं बोलतोय का? त्यामुळं साध्याच केंद्रातील आणि राज्यातील सरकार पुढची पाच वर्षे परवडणार आहे का? शेतकरी दिल्लीकडे आंदोलन घेऊन निघाले होते. तेंव्हा भाजप सरकारने लाठ्या चालवल्या. गोळीबार केला. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार का?

भाजपवर टीका करत म्हणाले की,

युवा वर्गाने सांगावं, गेली पाच वर्षे तुम्ही पाहिलेली आहेत. कोरोनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि सरकारने कसं कार्य केलं, हे प्रकर्षाने दिसत होतं. पण ह्या सरकारने इथले प्रकल्प घालवले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प जाऊ नये म्हणून मी स्वतः आंदोलन केले. तो प्रकल्प इथं झाला असता तर आपल्याला नोकऱ्या मिळाल्या असत्या का? प्रकल्प, वर्ल्ड कप मॅच हे सगळं गुजरातला पळवले. ठराविक राज्याचा विकास, इतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी. अशी राखरांगोळी ह्या सरकारने केलं.

महिला ही आपल्या पाठीशी आहेत. उद्धव ठाकरेंवर या महिलांना खूप विश्वास आहे. तुम्ही सांगा आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतं का? महिलांवर अन्याय करणाऱ्या नेत्यांना पद देतात. गुंड नेत्यांसोबत बाळगत आहेत, मंत्रालयात येऊन रिल्स करतात. बिलकीस बानो वर भयानक बलात्कात झाला. त्यातील आरोपींना प्रचारावेळी गुजरात सरकारने बाहेर काढलं. आज ते प्रचार करतात. मुळात बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हायला, मात्र इथं काय घडतंय. बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपींना बाहेर काढून त्यांचा जयजयकार केलाय, अशा भाजपला आपण मतदान करणार का? असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com