Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरेंना पुन्हा डिवचंल; गुणरत्न सदावर्तेंची हिंदी सक्तीविरोधातील मोर्चावर टीका

राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसेनं मोर्चाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी येत्या 5 जुलै रोजी मुंबई मोर्चा काढणार असल्याचे आज जाहीर केले.
Published by :
Rashmi Mane

राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसेनं मोर्चाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी येत्या 5 जुलै रोजी मुंबई मोर्चा काढणार असल्याचे आज जाहीर केले. याला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "जी कोणती गोष्ट कायद्याच्या बाहेर असेल, शिक्षणाच्या विरोधात असेल, माझ्यासारख्या संविधान प्रेमी नागरिकांनी अशा मोर्चांना विरोध केलाच पाहिजे. वंचितांच्या, शोषितांच्या, कर्मचाऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या अशा सर्वांच्याच मोर्चांना उच्च न्यायालयाने आझाद मैदानात जागा निश्चित केलेली आहे."

"हे कुठून आलेत लाडोबा बाई लाडोबा. यांना काय वेगळा कायदा आहे का? उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. राज ठाकरे यांची भूमिका आणि राज ठाकरेंनी ठरवलेलं स्थळ याला आमचा विरोध आहे. यासाठी पोलीस आयुक्त ते पोलीस महासंचालनाकडे तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनादेखील आम्ही निवेदन दिले आहेत. अशा मोर्चाला प्रतिबंध घालावा," अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

तसेच, "हा देश एक संघ भारत आहे. 16 तारखेपासून शाळा सुरू झालेले आहेत. त्रैवार्षिक शिक्षण हे संपूर्ण देशासाठी आहे. कोण राज ठाकरे?, व्हू इस धीस राज ठाकरे?, राज ठाकरेंचा न्यूसन्स व्हॅल्यू काय आहे?, पॉलिटिकल व्हॅल्यू काय आहे?," असा सवाल गुणरत्न यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरेंना पुन्हा डिवचंल; गुणरत्न सदावर्तेंची हिंदी सक्तीविरोधातील मोर्चावर टीका
Blast In High School : स्फोट..., गोंधळ... आणि चेंगराचेंगरी...; ऐन परीक्षेच्या वेळी हायस्कूलमध्ये Blast ! 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 260 जण जखमी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com