श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर संतप्त जमावाकडून तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न

श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर संतप्त जमावाकडून तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न

श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्लीसह देशाला हादरवून टाकले.

श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्लीसह देशाला हादरवून टाकले. आफताब पूनावाला याची पॉलीग्राफ चाचणीनंतर घेऊन जात असताना दिल्लीतील रोहिणी येथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली. त्यानंतर जमावाने घटनास्थळ गाठून वाहनावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी या लोकांच्या हातात तलवारी होत्या. या जमावातील लोकं ते आफताबला मारुन टाकण्याबाबत बोलत होते.

संतप्त जमावाने पोलिस व्हॅनवरही दगडफेक केली. ज्या व्यक्तिनं हल्ला केला तो यावेळी म्हणाला की, त्याला दोन मिनिटांसाठी बाहेर काढा, मारून टाकू. आफताबची रोहिणीच्या एफएसएलमध्ये पॉलीग्राफ चाचणी सुरू होती. त्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्यासोबत परत जात होते. दरम्यान, काही लोकांनी पोलिस व्हॅनवर हल्ला केला. आवश्यकता भासल्यास उद्या आफताबलाही या चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. पॉलीग्राफ चाचणी संपल्यानंतर नार्को चाचणी सुरू केली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com