भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा नवा लूक चर्चेत

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा नवा लूक चर्चेत

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा नवा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा नवा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. राहुल गांधीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत.

यावेळी केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. त्यापूर्वी राहुल गांधीचा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तब्बल 6 महिन्यांनंतर त्यांनी दाढी सेट केलेली दिसत आहे. केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे.

कापलेले केस आणि दाढी, कोट टाई आणि जॅकेट देखील राहुल गांधी यांनी घातल्याचं त्यामध्ये दिसत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत दाढी देखील वाढली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com