ताज्या बातम्या
Sanjay Raut On Devendra Fadnavis : 'ठाकरे एकत्र येणार याचा धसका'; सरकारच्या निर्णयावरून संजय राऊतांनी महायुतीला डिवचलं
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारनं घेतलेला शहाणपणाचा निर्णय असल्याचा खोचक टोला लगावला आहे.
राज्यात हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी बंड पुकारल्यानंतर सरकारनं हिंदी भाषा सक्तीसंबंधीत दोन्ही जीआर रद्द करण्यात निर्यण आज जाहीर केला. या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारनं घेतलेला शहाणपणाचा निर्णय असल्याचा खोचक टोला लगावला आहे. तसेच मोर्चाच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याचा धसका महायुती सरकार घेतला असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, येत्या ५ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.