FIR दाखल केल्यानंतर बृजभूषण सिंह म्हणाले...
Admin

FIR दाखल केल्यानंतर बृजभूषण सिंह म्हणाले...

भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली.

एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी घेतला आहे. एफआयआर नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील सुमारे 10 पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

यावर आता बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बृजभूषण सिंह म्हणाले की, एफआयआरची प्रत सध्या माझ्याकडे नाही. पण एफआयआर झालीच असेल तर मला त्यात काही गैर दिसत नाही. माझा दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी या आरोपांना सामोरे जाण्यास तयार आहे. असे ते म्हणाले.

FIR दाखल केल्यानंतर बृजभूषण सिंह म्हणाले...
Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com