11 मे नंतर राज्यात मोठ्या घडामोडींना वेग; कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे ट्विट
Admin

11 मे नंतर राज्यात मोठ्या घडामोडींना वेग; कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.

यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. असीम सरोदे यांनी यावर ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष, पदाधिकारी यांची निवड ही १० मेच्या आधीच होणार आहे. १ मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार. असे असीम सरोदे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com