शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कराळे गुरुजी म्हणाले...

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कराळे गुरुजी म्हणाले...

कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर कराळे गुरुजी यांनी माध्यमांशी संवाद साधला. कराळे गुरुजी म्हणाले की, मी मागे काही भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर ही सीट मलाच मिळेल. माझी संपूर्ण तयारी वर्धा मतदारसंघात चालू आहे. त्याच्यामुळे वर्धेत जे काही स्थानिक नेते आहेत त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे प्रचंड मतांनी मी विजयी होऊ शकतो. पवार साहेब यांनाही याबाबत सांगितले.

येणाऱ्या काळात पवार साहेब आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच आम्ही यावर यशस्वी होऊ. चांगला एक प्रशस्त मार्ग आणि भारताच्या संसदेत शेतकरी, गोरगरिब आणि कष्टकरी यांचा आवाज मी नक्की बुलंद करीन. हे मी पवार साहेबांना सांगितले. आता शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच मला मिळेल. महाविकास आघाडीचा कोणताही घटक पक्ष असेल तर मी त्याला सपोर्ट करेल.

पवार साहेब माझ्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांना असं वाटते की नवीन युवक राजकारणात यायला पाहिजेत आणि नवीन युवक राजकारणात आले तर कुठतरी बदल होऊ शकतात. असे कराळे गुरुजी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com