मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले; त्यामुळे मला गुरे पाळण्यास...
Admin

मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले; त्यामुळे मला गुरे पाळण्यास...

मुख्यमंत्री कोण होणार यावरुन दोन दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री कोण होणार यावरुन दोन दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला असून कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.डी. के शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू होती.

त्यानंतर आता सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सर्व हमींची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस पक्ष कुटुंबाप्रमाणे काम करेलशेतकरी आदींना लक्ष्य करत पाच हमी योजना जाहीर केल्या. त्याची पूर्तता करण्याची आता मागणी होत आहे.काँग्रेसने जाहीर केलेल्या पाच हमी योजनांचाही या विजयात मोठा वाटा आहे. कर्नाटकातील जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी आमचे हात नेहमीच एकजूट असतील.

प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कर्नाटकचा अभिमान राखण्यासाठी मी अविरतपणे काम करत राहीन.ज्या काळात मॅट्रिक पास होणे कठीण होते, त्या काळात मी कुटुंबातील पहिला पदवीधर होतो. मी माझे बालपण सिद्धरामण हुंडीत घालवले. कठीण परिस्थितीमुळे मला माझे शिक्षण काही काळ बंद करावे लागले आणि त्यामुळे मला गुरे पाळण्यास सांगितले गेले. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कर्नाटकचा अभिमान राखण्यासाठी मी अथक प्रयत्न करत राहीन. असे सिद्धरामय्या म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले; त्यामुळे मला गुरे पाळण्यास...
Siddaramaiah Karnataka New CM : अखेर ठरलं! सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com