Siddaramaiah Karnataka New CM
Siddaramaiah Karnataka New CM

Siddaramaiah Karnataka New CM : अखेर ठरलं! सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

तब्बल चार दिवसाच्या माथापच्ची नंतर कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा पेच निकाली निघाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार शपथ घेणार आहेत.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

कर्नाटकात (Karnataka Assembly Election) काँग्रेसचं बहुमत सिद्ध झालं झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावरुन दोन दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला असून कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.डी. के शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू होती. अखेर यामध्ये सिद्धरामैय्या यांनी बाजी मारली असून 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे. ज्यामध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

शेतकरी, वकील, राजकारणी... कर्नाटकचा कायापालट करणाऱ्या सिद्धरामय्यांचा प्रवास

दोन्ही नेत्यांनी बुधवारी दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. संकट दूर करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या घरी सिद्धरामय्या आणि सुरजेवाला यांची बैठक झाली. बैठकीत प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाच्या वाटपासह अनेक सूत्रांवर चर्चा करण्यात आली. मात्र, डीके यांनी अशा कोणत्याही सूत्रांवर अनौपचारिकपणे नाराजी व्यक्त केली होती.

सिद्धरामय्या यांच्यानंतर शिवकुमार यांनीही बुधवारी रात्री सुरजेवाला यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष खर्गे यांच्या घरी केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सिद्धरामय्या रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी सुरजेवाला यांच्याशी पुन्हा चर्चा केली. अनेक बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.

दरम्यान, डीके शिवकुमार यांचा जिल्हा असलेल्या रामनगरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवरून त्यांचे समर्थक नाराज होऊन गोंधळ घालू शकतात, असे मानले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवकुमार यांच्या विधानसभा मतदारसंघ कनकापुरा येथे विशेष सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com