निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जनता दरबार घेणार

निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जनता दरबार घेणार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलं आहे. विधिमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्याचं पहिल्यांदाच निलंबन झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवीगाळ प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जनता दरबार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. विधिमंडळ परिसरातील शिवालय कार्यालयात जनता दरबार घेणार आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढील पाच दिवस "शिवालय" येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून जनता दरबार घेणार आहेत. पुढील 5 दिवस जनता दरबारात जनतेचे प्रश्न समजून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com