DGCA Big Decision : विमान सुरक्षेसंदर्भातच सरकारचे आदेश, अटींची पुर्तता आवश्यक
12 जून रोजी गुजरात मधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या ड्रीमलाइनर हे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मात्र या अपघाताची भीषणता इतकी होती कि या विमानात 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. मात्र आता या विमान अपघातावर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोणत्या तांत्रिक बाबींमुळे हा भीषण अपघात झाला त्यामागची कारणे काय याबाबत समग्र चर्चा केली जात आहे. आणि त्यावर मोठा निर्णय घेत भारत सरकारने बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासंर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हणजेच डीजीसीएने एक पत्रव्यवहार केला असून त्यात एअरइंडिया कडून या प्रकरणातला जो काही तपास अहवाल आहे तो मागवला आहे. विमानाची सुरक्षा आणि त्याच्या देखभालीसंदर्भात अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. त्यातच बोईंग कंपनी विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी येत आहेत, आणि वेळोवेळी डीजीसीएने याबाबत योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेश ही दिले होते. मात्र असे असून ही कालची जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक असून या अपघातासंदर्भात जो काही विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यासंदर्भात तपासणीचे आदेश देणारे पत्र डीजीसीएने ने एअरइंडिया कंपनीला लिहिले आहे. एअरइंडिया कडून या संदर्भात तपासणी अहवाल डीजीसीएने मागवला आहे. याद्वारे विमानामध्ये कोणत्या कारणांमुळे
हा अपघात झाला ह्याचे नेमके कारण समजू शकणार आहे. विमानाच्या तांत्रिक बाबी तपासण्यासंदर्भात आणि सुरक्षेसंदर्भातला रिपोर्ट आता एअरइंडियाला द्यावा लागणार आहे. तसेच सर्व विमान कंपन्यांना सुरक्षेसंदर्भात काही महत्वाचे निर्देश दिले गेले आहेत, त्यानुसार खालील बाबी तपासून अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
15 जून पासून भारतातुन विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी करणे अनिवार्य आहे.
इंधनाचे मोजप्रणाली आणि त्यावरील देखभाल केली गेली पाहिजे
केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
इंधन चालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा
9 पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
या संदर्भात अमेरिकेचे सरकार आणि आणि संसदेने ही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता विमानामध्ये होण्याऱ्या बिघाडांवर लक्ष ठेवले जाणार असून त्याद्वारे उपाययोजना करणे शक्य होणार आहे.