शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पुण्यात झळकले विनंती करणारे बॅनर्स
Admin

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पुण्यात झळकले विनंती करणारे बॅनर्स

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले.

राज्यभरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. अशातच पुण्यातील कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावत निवृत्ती मागे घेण्याची मागणी केली आहे. "साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. असे बॅनर्सवर लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com