भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यानंतर देशभर ‘हात से हात जोडो’ अभियान होणार सुरु
Admin

भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यानंतर देशभर ‘हात से हात जोडो’ अभियान होणार सुरु

भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यानंतर देशभर ‘हात से हात जोडो’ अभियान सुरु करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यानंतर देशभर ‘हात से हात जोडो’ अभियान सुरु करण्यात येणार आहे. . मुंबईत येत्या १८ फेब्रुवारीपासून प्रत्येक प्रभागात हे अभियान राबिवण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईत येत्या १८ फेब्रुवारीपासून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार हे अनिश्चित असले तरी, त्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. काँग्रेस अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पक्षाचे राज्याचे प्रभारी पाटील रविवारी मुंबईत आले होते.त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिलेल्या ‘हात से हात जोडो’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com