Sunjay Kapur : संजय कपूरनंतर नवीन उत्तराधिकारी कोण? कंपनीद्वारे एक जाहीर निवेदन सादर
12 जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळत असताना करिष्मा कपूरचा एक्स नवरा आणि उद्योगपती संजय कपूर यांचे हार्ट अटॅकमुळे वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. मात्र आता त्यांच्या आकस्मित मृत्यू नंतर त्यांच्या सोना कॉमस्टार या कंपनीची जबाबदारी कोणाला मिळणार यावर अनेक तर्क वितर्क करण्यात येत होते. या गोष्टींना पूर्णविराम देत सोना कॉमस्टार कंपनीने एक जाहीर निवेदन सादर करून या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
सोना कॉमस्टार या जागतिक दर्जाच्या कंपनीचे संजय कपूर अध्यक्ष होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्या कंपनीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यांनी आपल्या कंपनीचा भारत, अमेरिका, चीन, मेक्सिको सर्बिया यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार वाढवला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण? 31 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेची जबाबदारी कोणावर येणार असे अनेक प्रश्न समोर उभे होते.
त्या संदर्भात कंपनीच्या वतीने एक अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आले की, "सोना कॉमस्टारचे माजी अध्यक्ष संजय कपूर यांच्या अकस्मात निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले त्याचबरोबर 2019 पासून सीईओ विवेक विक्रम सिंग यांच्यासोबत कंपनीचे व्यावसायिक व्यवस्थापन आणि कंपनीचे नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे चालू आहे" असे सांगण्यात आले. सध्या काम कंपनीचे कामकाज हे सुरळीत सुरू आहे आणि त्याच्या व्यवस्थापनामध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कंपनीच्या संचालक मंडळाची एक अधिकृत बैठक घेण्यात येईल आणि त्यामधूनच मंडळाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.कंपनीची जबाबदारी जे कोणी स्वीकारतील त्यांना योग्य रीतीने मान दिला जाईल. मात्र संजय कपूर यांची मुले या कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी अजूनही लहान आहेत त्यामुळे त्या कंपनीच्या उत्तराधिकाराबाबत अद्याप घोषणा केलेली नाही अशी माहिती या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले. सोना कॉमस्टार ही एक ऑटोमोबाईल कंपनी असून वाहनांचे सुटे भाग बनवणारी ही कंपनी आहे. संजय कपूर यांच्या पश्चात दुसरी पत्नी करिष्मा हिच्यापासून त्यांना दोन मुले आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव तिच्यापासून त्यांना एक मुलगा आहे.
संजय कपूरला दत्तक मुलीसह एकूण चार मुलं आहेत. पण ही सर्व मुले अजूनही लहान आहे आणि या कंपनीच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळू शकणार नाही. मात्र संजय कपूर यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव हिला संजय कपूरच्या सर्व मालमत्तेची जबाबदारी घेण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. मात्र तरीही कंपनी कोणाच्या हातात जाईल कोणाला कंपनीचे उत्तराअधिकार मिळेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेली नाही