Admin
बातम्या
जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा राजीनामा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.