Uddhav Thackeray
Uddhav ThackerayUddhav Thackeray

Uddhav Thackeray : "कर्माच्या फळाचा सामना...." महायुतीच्या विजयानंतर शिंदेसेनेतील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Nagar Parishad election Result 2025 : आता गाव, खेड्यापर्यंत विकास पोहोचवायचा आहे आणि याचा फायदा आम्हाला आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होईल."
Published by :
Riddhi Vanne
Published on

After the victory of the Mahayuti, Shinde Sena leader Sanjay Shirsat hit out at Uddhav Thackeray : संजय शिरसाट यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "या निवडणुकीतून आम्ही एक धडा घेतला आहे. पुढील निवडणुकीत युतीत लढायला हवं. एकमेकांमध्ये काही मतभेद नसावेत, याची काळजी घेतली पाहिजे."

ते पुढे म्हणाले, "शिवसेनेच्या साडेतीन वर्षांच्या कार्याचा हा परिणाम आहे. आम्ही कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक ठिकाणी फिरत होतो आणि योजनांचं योग्य पद्धतीने राबवणं करत होतो. आम्ही कधीही नंबर १ राहण्याचा दावा केला नव्हता, पण मी नेहमी सांगत होतो की आम्ही दोन नंबरवर राहू. स्ट्राइक रेट पाहता, आम्ही सर्वोत्तम काम केलं आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या जागांपेक्षा आमचं काम पुढे आहे. आता गाव, खेड्यापर्यंत विकास पोहोचवायचा आहे आणि याचा फायदा आम्हाला आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होईल."

शिरसाट यांनी अधिक स्पष्ट करत सांगितलं, "मोठा पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेना जास्त जागा मिळवणारच. त्यामुळे त्यांची संख्या जास्त होती. त्यांची भूमिका आम्ही नाकारलेली नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका लढवणं आणि व्यवस्थापन करणं थोडं कठीण झालं. यापूर्वी भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात होते, त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. जर चांगलं प्लॅनिंग केलं असतं तर अजून अधिक यश मिळालं असतं."

ते म्हणाले, "कर्माच्या फळाचा सामना करावा लागतो. काही लोकांनी कधीच सभा घेतली नाहीत. कार्यकर्त्यांना मदत मिळाली नाही आणि प्रचारातही कुणी सामील झाले नाहीत. आता एक गोष्ट समोर आली आहे की काही उमेदवार उबाठाच्या बाजूला होते आणि नंतर दुसऱ्या पक्षात गेले. यामुळे ठाकरे गटात असंतोष वाढला आहे आणि गट कमजोर होईल."

शिरसाट यांनी पराभवावर भाष्य करत सांगितलं, "लोकशाहीत विजय हा विजयच असतो, तो पैशामुळे किंवा ईव्हीएममुळे झाला, असं सांगणं चुकीचं आहे. पराभवाचं रूपांतर विजयात होणार नाही. जनतेने जो कौल दिला आहे, तो मान्य करावा लागेल." अखेर, शिरसाट यांनी जिल्ह्यातील निकालावर प्रतिक्रिया दिली, "आम्ही मोठे भाऊ ठरलो आणि ज्या ठिकाणी आमचं विजय निश्चित नव्हतं, त्या जागा काँग्रेसकडे गेल्या आहेत. त्यावर आम्ही समाधानी आहोत."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com