हिवाळी अधिवेशनानंतर हे तीन मंत्री कर्नाटक दौऱ्यावर जाणार

हिवाळी अधिवेशनानंतर हे तीन मंत्री कर्नाटक दौऱ्यावर जाणार

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती.महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद वाढल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हा वाद सोडवण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची भेटही घेतली मात्र तरीही आता हा वाद थांबताना दिसत नाही आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करुन सांगितले की, सीमाभागातील मराठीजनांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेणार आहे.सीमाभागातील बंधू-भगिनींशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर उच्चाधिकार समितीचे समन्वयक मंत्री म्हणून मी आणि मा. चंद्रकांतदादा पाटील जाणार आहोत. अशी माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com